"आजचा दिवस माझ्यासाठी आणि आपल्या संपूर्ण ग्रामपंचायतीसाठी अभिमानाचा क्षण आहे. स्वातंत्र्यदिनासारख्या पवित्र दिवशी, आपल्या गावातील संघर्षातून उभ्या राहिलेल्या एकल, विधवा व परित्यक्ता महिलांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मान देणे, हा त्यांच्या धैर्य, जिद्द आणि समाजातील योगदानाचा सन्मान आहे. हा उपक्रम प्रत्येकाला संदेश देतो की स्त्री ही केवळ घराची नव्हे तर देशाची ताकद आहे. ग्रामपंचायत साखर सदैव अशा प्रेरणादायी कार्यासाठी कटिबद्ध राहील."
ग्रामपंचायत साखर कोंढवली आपले स्वागत करते
सक्षम प्रशासन
समृद्ध व स्वयंपूर्ण गाव
लोकसहभागातून विकास





